सहन शिलतेवर कविता | self-control Poems in Marathi 2024

self-control Poems in Marathi

” सहन शिलता “


जो तो जगाच्या नजरेत
होवू पाहतो, खुप महान
आमच्या सारखे आम्ही
उगाच दिखावा,खोटी शान !!१!!

लहान मोठ्याचा ताळमेळ नाही
कुणी कुणाचा, जिवलग नाही
नात्या नात्यात कटुता वाढली
जनता सारी, “मी”पणात अडली !!२!!

“सहन शीलता” आटत चालली
दुनिया संपत्तीच्या मोहात पडली
मीच श्रेष्ठ, ही चुकीची समज
जिकडे तिकडे होतो गैरसमज !!३!!

आदर ची चादर विरली
नाती,गोती अहंकाराने गोठली
ऐकण्याची क्षमता, झाली कमी
चांगल्या वागण्याची ,नाही हमी !!४!!

सोच सारी दुजेपणाची वाढली
दुनिया वेगळया,दिशेनं चालली
सहन शीलता कुणात नाही
फायदा आपला क्षणात पाही !!५!!

कवी/लेखक/विचारवंत.
जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद.
@जनार्दन

Leave a Comment