त्याग अन् स्त्री जीवन
त्याग आणी स्त्री जीवन…
जुळते साम्य बरोबरी…
स्त्री जिवनाचा प्रवास सांगतो
पावलो अन् पावले..
त्याग स्त्रीचा..
कधी आई तर कधी बहिण..
कधी मुलगी तर कधी सून…
कधी पत्नी, कधी मैत्रीण….
अनेक रूपे तिची सागतो
त्याग तिच्या आयुष्याची…
प्रत्येक नाती जपतांना..
केलेला त्याग स्वप्नांचा…
कारण नात्यांहून
तिच्यासाठी काही मोठं नसतं….
डोळ्यात स्वप्न, हृदयात प्रेम..
मुखात मधूरवाणी, खांद्यावर जबाबदारी…..
अशी ही त्याग अन् स्त्री जीवनाची समानता…
शब्दात व्यक्त न होणारी…
-ADITYA ZINAGE